चंद्रपूर महाऔष्णिक विद्दुत केंद्रात अपघात . चार कामगार गंभीरचंद्रपूर प्रतिनिधी :-
चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रात आज जवळपास 12.00 च्या दरम्यान यूनिट क्रमांक 6 मधे बॉयलर चे काम करीत असतांना कंत्राटदार अडोरे यांचे कामगार कर्मचारी चढता चढता पडल्याने भाजून गंभीर जखमी झाल्याचा गंभीर प्रकार घडला आहे. यापैकी एका कामगाराला डॉ. मेहता यांच्या रूग्णालयात तर उर्वरित तीन कामगारांना गाडेगोणे यांच्या रूग्णालयात भरती करण्यात आले असून एकाची प्रक्रुती अतिशय गंभीर असल्याची माहीती आहे. चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रात मागील अनेक वर्षापासून ठेकेदारी करणार्या अडोरे कंत्राटदारांना क्लिनिंगचे तांत्रिक कामे करण्याचा ठेका आहे. मात्र सेफ्टीच्या बाबतीत कंत्राटदार अडोरे यांनी कुठल्याच उपाययोजना केल्या नसल्याने आता आता या अपघाताने सिद्ध झाले आहे. सोबतच या विभागाचे कार्यकारी अभियंता चव्हाण यांचे सुद्धा या सेफ्टी कडे दुर्लक्ष झाल्याने हा अपघात झाल्याचे बोलल्या जात आहे. आता या अपघाताचे खापर कुणावर फोडल्या जाईल याबाबत स्पष्ट नसले तरी कंत्राटदार अडोरे आणि कार्यकारी अभियंता चव्हाण हे खरे कामगारांच्या अपघाताला दोषी असल्याची चर्चा आहे.

Post a comment

0 Comments