चंद्रपूर : 93 व्यक्तींचे अहवाल प्रतीक्षेत
चंद्रपूर 26 मे ( MH34UPDATENEWS) : जिल्ह्यातील कोविड-19 ची एकूण चाचणी केलेल्या व्यक्तींची संख्या 830 आहे. यापैकी 22 व्यक्ती पॉझिटिव्ह असून 715 निगेटिव्ह आहे. तर, 93 व्यक्तींचा नमुना अहवाल प्रतीक्षेत आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात आतापर्यंत 4 हजार 529 व्यक्तींचे संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले आहे. यापैकी ग्रामस्तरावर 3 हजार 721, तालुकास्तरावर 482 तर चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रात 326 व्यक्ती संस्थात्मक अलगीकरणात आहे. जिल्ह्यामध्ये आतापर्यंत गृह अलगीकरण पूर्ण झालेले 56 हजार 680 व्यक्ती आहेत. तर 13 हजार 291 नागरिक गृह अलगीकरण प्रक्रियेत आहे.

Post a comment

0 Comments