चंद्रपूर 17 मे (MH34UPDATE News): करोनाचे सावट अद्यापही कायम असून प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून ३१ मे पर्यंत जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन कायम राहणार आहे. आंतर जिल्हा आंतरराज्यीय विनापरवाना वाहतुकीला बंदी घालण्यात आली आहे. लग्नसमारंभासाठी फक्त ५० लोकांना परवानगी देण्यात आलेली आहे. सर्व शासकीय आस्थापना शंभर टक्के उपस्थितीत सुरू राहतील. सर्व प्रकारच्या शहरी व ग्रामीण भागातील औद्योगिक आस्थापना व वसाहती, युनिट, सुरू राहतील. लग्नसमारंभासाठी फक्त ५० लोकांना परवानगी असेल, अंत्यविधीसाठी शारीरिक अंतर राखून २० लोकांच्या उपस्थितीस परवानगी दिली जाईल. शेतीविषयक सर्व कामांसाठी परवानगी असून कृषी केंद्रांना १० ते ५ अनुमति राहील.धार्मिक कार्यक्रमांच्या आयोजनावर निर्बंध कायम आहे. सार्वजनिक स्थळी ५ किंवा पाचपेक्षा जास्त व्यक्तींनी एकत्र जमा होऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे. आंतर जिल्हा आंतरराज्यीय विनापरवाना वाहतुकीला बंदी घालण्यात आले आहे.