वार्ड क्र. 3 दुर्गापूर येथील प्रतिबंधीत क्षेत्रात आ. सुधीर मुनगंटीवार यांनी तातडीने पोहचविली मदतजीवनावश्‍यक वस्‍तुंच्‍या किट्स, लहान मुलांसाठी दुध पावडरचे डबे व मुस्‍लीम कुटूंबियांसाठी शेवयी किटचे वितरण


चंद्रपूर :- तालुक्यातील दुर्गापूर येथे दोन दिवसापूर्वी एक रूग्‍ण कोरोना पॉझिटीव्‍ह आढळल्‍याने या परिसरातील वार्ड नं. 3 हा भाग प्रतिबंधीत करण्‍यात आला आहे. या भागात प्रामुख्‍याने मजूर वर्गातील नागरिक वास्‍तव्‍यास आहे. तेथील नागरिकांनी माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांना दूरध्‍वनीद्वारे प्रतिबंधामुळे निर्माण झालेल्‍या अडचणी सांगत मदतीची मागणी केली. आ. मुनगंटीवार यांनी तात्‍काळ नागरिकांच्‍या मागणीची दखल घेत भाजपा पदाधिका-यांची चमू सदर परिसरात पाठवून मदत पोहचविली.
वार्ड क्र. 3 दुर्गापूर येथील प्रतिबंधीत क्षेत्रात 200 जीवनावश्‍यक वस्‍तुंच्‍या किट्स व भाजीपाला यासह ज्‍या कुटूंबांमध्‍ये लहान मुले आहेत त्‍यांच्‍याकडे 50 मिल्‍क पावडरचे डबे भाजपा पदाधिका-यांच्‍या माध्‍यमातुन वितरीत करण्‍यात आले. दिनांक 24 मे रोजी ईद सण असल्‍यामुळे मुस्‍लीम परिवारामध्‍ये शेवयांच्‍या किटचे सुध्‍दा वितरीत करण्‍यात आले आहे. भाजपा नेते रामपाल सिंह, जिल्‍हा परिषद सदस्‍या रोशनी खान, भाजपाचे चंद्रपूर तालुकाध्‍यक्ष हनुमान काकडे, दुर्गापूरचे सरपंच श्रीनिवास जनगम, देवानंद थोरात, राजेंद्र मेश्राम यांची यावेळी प्रामुख्‍याने उपस्थिती होती.

या प्रतिबंधीत क्षेत्रातील नागरिकांना कोणतीही अडचण भासल्‍यास आ. मुनगंटीवार यांच्‍या वतीने आम्‍ही त्‍या अडचणींचे निराकरण करण्‍यासाठी सदैव तत्‍पर असल्‍याची ग्‍वाही यावेळी भाजपा नेते रामपाल सिंह यांनी नागरिकांना दिली. दुपारी केलेल्‍या मागणीची तात्‍काळ दखल घेत संध्‍याकाळीच मदत पोहचविल्‍याबद्दल या प्रतिबंधीत क्षेत्रातील नागरिकांनी आ. सुधीर मुनगंटीवार यांचे आभार व्‍यक्‍त केले आहे.

Post a comment

0 Comments