Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

2019 मध्ये कर्जमाफीसाठी पात्र सर्व शेतकऱ्यांना खरीप 2020 हंगामामध्ये पिक कर्ज वाटप व्हावे
चंद्रपूर, दि. 28 मे : महाराष्ट्र शासनाने महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्ज मुक्ती योजना 2019 अंतर्गत ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफी साठी पात्र ठरविले आहे. त्यांची यादी सर्व बँकांकडे आहे. काही शेतकऱ्यांच्या कर्जमाफी खात्यामध्ये राज्य शासनाकडून रक्कम जमा झाली नसली तरी ती आगामी काळात होणार असल्याचे राज्य शासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे त्यांना थकित खातेदार न ठरवता खरीप 2020 हंगामामध्ये कर्ज वाटप करण्याचे स्पष्ट निर्देश जिल्हा प्रशासनाने दिले आहे.

महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या अंतिम पात्र यादी मध्ये नाव असतांना देखील काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नसेल, तर ही रक्कम जमा करण्याची जबाबदारी राज्य शासनाची आहे. यासंदर्भातला अध्यादेश स्वयंस्पष्ट असून खरीप 2020 हंगामासाठी नवीन पीक कर्ज घेताना 2019 च्या पात्र यादीतील शेतकऱ्यांना कर्ज नाकारता येणार नाही,असे स्पष्ट निर्देश नव्या अध्यादेशात दिले असून बॅंकांनी त्याचे तंतोतंत पालन करावे असे स्पष्ट करण्यात आले आहे.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, व्यापारी बँका, ग्रामीण बँका व अन्य बँकांनी यासंदर्भात कशा पद्धतीने कार्यवाही करावी, याबाबतचे स्पष्ट विवरण शासनाने जाहीर केले आहे. बँकांनी करावयाच्या कारवाईबाबत पुढील प्रमाणे निर्देश देण्यात आले आहे.

अशी असणार कार्यवाही :

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील खाते :

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 या कर्जमुक्ती योजनेअंतर्गत शासनाकडून योजनेच्या पोर्टलवर प्रसिद्ध केलेल्या यादीमधील ज्या लाभार्थ्यांना त्यांच्या कर्जखात्यावर योजनेंतर्गत लाभ देण्यात आला नाही अशा लाभार्थ्यांना थकबाकीदार न मानता खरीप 2020 साठी पीक कर्ज द्यावे.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकानी कर्जमुक्ती योजने अंतर्गत वर नमूद केलेल्या थकबाकीदार शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यावर योजनेअंतर्गत निर्गमित केलेल्या यादीमधील थकबाकीची रक्कम शासनाकडून येणे दर्शवावी. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकांनी या अनुषंगाने संबंधीत विविध कार्यकारी सहकारी संस्था यांना कळवावे. संबंधीत विविध कार्यकारी सहकारी संस्था यांनी अशा शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यावर असलेली रक्कम "शासनाकडून येणे दर्शवावी" व त्यांनी अशा शेतकऱ्यांस खरीप 2020 साठी पीक कर्ज द्यावे.

शासनाकडून येणे रकमेवर वर नमूद केल्याप्रमाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांनी दिनांक एक एप्रिल पासून सदर रक्कम त्यांना प्राप्त होण्याच्या दिनांकापर्यंत, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकानी त्यावर व्याज आकारणी करावी. शासनाकडून संबंधित जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेस असा निधी व्याजासह देण्यात येईल. मात्र सदर योजनेमध्ये पोर्टलवर प्रसिद्ध केलेल्या यादीमधील ज्या शेतकऱ्यांच्या कर्जखात्यावर कर्जमुक्तीची रक्कम जमा झाली नाही. अशा शेतकऱ्यांना संबंधित जिल्हा मध्यवर्ती बँकांनी खरीप 2020 साठी पीक कर्ज उपलब्ध करून दिल्यास,अशाच खातेदारांच्या कर्जमुक्ती योजनेंतर्गत शासनाकडून देय असलेल्या रकमेवर शासन संबंधित जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना व्याज देईल.


व्यापारी बँका व ग्रामीण बँकेतील खाती :

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 या कर्जमुक्ती योजनेअंतर्गत शासनाकडून योजनेच्या पोर्टलवर प्रसिध्द केलेल्या यादीमध्ये लाभार्थ्यांची कर्जमाफीची रक्कम व्यापारी बँका व ग्रामीण बँका यांनी "शासनाकडून येणे दर्शवावी" तसेच, व्यापारी व ग्रामीण बँकामध्ये शेतकऱ्यांच्या एनपीए कर्ज खात्यावर शासनाकडून अशा कर्जखात्यावर देय असलेली रक्कम "शासनाकडून येणे दर्शवावी" व याशिवाय अशा एनपीए कर्ज खात्यावर बँकांनी सोसावयाची रक्कम याचा अशा कर्जखात्यामध्ये अंर्तभाव करावा.

व्यापारी बँका व ग्रामीण बँकांनी तात्काळ लाभार्थी शेतकऱ्यांना खरीप 2020 साठी नवीन पीक कर्ज उपलब्ध करुन दयावे.

व्यापारी बँका व ग्रामीण बँकांनी लाभार्थ्यांच्या कर्जखात्यावर शासनाकडून येणे रकमेवर वर नमूद केल्याप्रमाणे देय असलेल्या रक्कमेवर दिनांक एक एप्रिल पासून त्यांना सदर रक्कम प्राप्त होण्याच्या दिनांकापर्यंत, अशा बँकानी त्यावर व्याज आकारणी करावी.

शासनाकडून संबंधित व्यापारी व ग्रामीण बँकेस असा निधी व्याजासह देण्यात येईल. मात्र सदर योजनेमध्ये पोर्टलवर प्रसिद्ध केलेल्या यादीमधील ज्या शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यावर कर्जमुक्तीची रक्कम जमा झाली नाही अशा शेतकऱ्यांना संबंधित व्यापारी बँका व ग्रामिण बँकांनी खरीप 2020 साठी पीक कर्ज उपलब्ध करून दिल्यास, अशाच खातेदारांच्या कर्जमुक्ती योजनेंतर्गत शासनाकडून देय असलेल्या रकमेवर शासन संबंधित व्यापारी बँक व ग्रामीण बँक यांना व्याज देईल.

Post a comment

0 Comments