सोशल मीडियावर 200 युनिटच्या चर्चेला उधाणसंचार बंदीच्या काळात चंद्रपूर करांना  मिळणारका 200 युनिट मोफत ? सोशल मीडियावर चर्चेला 

      


चंद्रपूर/प्रतिनिधी
                     
                देशामध्ये covid-19 संसर्ग रोगाच्या वाढता प्रादुर्भाव पाहता देशाचे पंतप्रधानांनी 24 मार्च पासून टप्प्याटप्प्याने संचारबंदी लागू केली अशांमध्ये सर्वसामान्य जनतेचे काम धंदे बंद असल्यामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे  तरी संचारबंदी च्या काळामध्ये अनेक सामाजिक संघटना शासन व राजकीय पक्षाकडून मिळेल ते मदत घेऊन आपल्या कशीबशी आपली व परिवाराची पोटाची ठिणगी भागवत आहे परंतु अशा परिस्थितीमध्ये अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे त्यापैकी एक म्हणजे सर्वांना वीज बिलाचे मोबाइल संदेश प्राप्त झाले आहे चंद्रपूर मध्ये मोठ्या प्रमाणावर कामगार कष्टकरी मजदूर वर्ग व रिक्षाचालक या सर्वांचे काम धंदे बंद असल्यामुळे वीज बिल भरायचे कुठून असा प्रश्न सर्वसामान्य जनतेत निर्माण झाला आहे आमदार साहेबांनी निवडणुकीच्या काळामध्ये 200 युनिट मोफत देऊ असे आश्वासन दिले होते मात्र अद्यापही आश्‍वासन पूर्ण  होताना दिसत नाही आहे संचारबंदी च्या काळामध्ये सर्वसामान्य लोकांचे काम धंदे बंद असल्यामुळे आमदारांनी दिलेले  200 युनिटचे आश्वासन तीन महिन्यासाठी तरी पूर्ण करावे अशा चर्चा सोशल मीडियावर व चंद्रपूर शहरांमध्ये जोर धरू लागल्या आहे  

Post a comment

0 Comments