Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

कोरोना मुक्त रुग्णाला टाळ्या वाजून दिली सुटी जिल्ह्यात आता ॲक्टिव कोरोना रुग्णांची संख्या 20चंद्रपूर, दि. 27 मे: चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची आता पर्यतची संख्या 22 असून यातील दोन रुग्णांना सुटी देण्यात आली. त्यापैकी बिनबा गेट परिसरातील युवतीला आज तिच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी टाळ्या वाजवत तिला रुग्णालयातून सुटी दिली. यापूर्वी कृष्ण नगर येथील रुग्णाला देखील नागपूर येथून सुट्टी देण्यात आली आहे. 22 पैकी 2 रुग्णांना आतापर्यंत सुटी दिली असून अन्य वीसही रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक निवृत्ती राठोड यांनी दिली आहे.आता जिल्ह्यात एकूण ऍक्टिव्ह कोरोना बाधित रुग्णांची संख्या 20 आहे.

जिल्ह्यात 20 रुग्णांपैकी 6 रुग्णांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चंद्रपूर तर 14 रुग्णांना कोविड केअर सेंटर, वन अकादमी चंद्रपूर येथे भरती करण्यात आलेले आहे.या सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर आहे.

जिल्ह्यात कोविड-19 संक्रमित रुग्णांच्या संपर्कातील संशयित व्यक्तींना शोधून त्यांना संस्थात्मक अलगीकरण कक्षात व गृह अलगीकरण कक्षात ठेवण्यात येत आहे. कंटेनमेंट झोनमध्ये सर्व कुटुंबातील लोकसंख्येचे दैनंदिन 14 दिवस आरोग्य पथकांमार्फत सर्वेक्षण करण्यात येत आहे.तसेच,आयएलआय,सारीचे रुग्ण शोधून त्यांना उपचाराखाली आणण्यात येत आहे.

कोविड-19 संक्रमित 22 रुग्णांची चंद्रपूर जिल्ह्यात इतर राज्यातून, जिल्ह्यातून,रेडझोन मधून प्रवास केल्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील राज्यनिहाय व जिल्हानिहाय एकूण संख्या पुढील प्रमाणे आहे. दिल्ली -1,मुंबई-3, ठाणे -2, पुणे-6, यवतमाळ -2, नाशिक -3, कोणत्याही प्रकारचा प्रवासाचा इतिहास नाही किंवा पॉझिटिव्ह रुग्णांचे सहवासीत -5 आहे.

आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तपासणीस पाठवलेले स्वॅब नमुने 881 आहे. यापैकी 22 नमुने पॉझिटिव्ह असून 776 निगेटिव्ह आहे. तर, 83 नमुने अहवाल प्रतीक्षेत आहे.

अशी आहे तालुकानिहाय पॉझिटिव्ह व्यक्तींची संख्या:

ग्रामीण भागामधील चंद्रपूर 6, बल्लारपूर 2, पोंभूर्णा 1, सिंदेवाही 2, मुल 3, ब्रह्मपुरी 1 पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. तसेच शहरी भागामधील बल्लारपूर 1, वरोरा 2 ‌ पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.तर चंद्रपूर महानगरपालिका मधील कृष्णनगर 1, बिनबा गेट 1, बाबुपेठ 1, बालाजी वार्ड 1 असे पॉझिटिव्ह रुग्ण आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत 4 हजार 562 व्यक्तींचे संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले आहे. यापैकी ग्रामस्तरावर 3 हजार 721,तालुकास्तरावर 482 तर जिल्हास्तरीय संस्थात्मक अलगीकरण 359 आहे.

जिल्ह्यामध्ये आतापर्यंत गृह अलगीकरण पूर्ण झालेले 58 हजार 370 व्यक्ती आहेत. तर 12 हजार 291 नागरिक गृह अलगीकरण प्रक्रियेत आहे.


संशयित रुग्णांचे आवश्यकतेनुसार कोविड-19 तपासणीसाठी नमुने घेण्यासाठी कार्यवाही करण्यात येत आहे. सध्या चंद्रपूर जिल्ह्यात ग्रामीण भागात 8 व महानगरपालिका क्षेत्रात 3 असे एकूण 11 कंटेनमेंट झोन कार्यान्वित करण्यात आलेले आहे.

जिल्ह्यात सध्या एकूण 11 कंटेनमेंट झोन सुरु असून अति जोखमीच्या संपर्कातील व्यक्तींची संख्या 100 व कमी जोखमीच्या संपर्कातील व्यक्तींची संख्या 77 असे एकूण 177 संपर्कातील व्यक्तींची संख्या असून 88 संपर्कातील व्यक्तीचे स्वॅब नमुने घेण्यात आले आहेत. त्यापैकी 7 पॉझिटिव्ह, 65 निगेटिव्ह, 16 प्रतीक्षेत आहेत. उर्वरित 12 व्यक्ती जिल्ह्याबाहेरील असल्याने स्वॅब नमुने घेण्यात आलेले नाही व इतर जिल्ह्यांना कळविण्यात आलेले आहे. याशिवाय कंटेनमेंट झोनमधील सर्वेक्षणात आढळलेल्या आयएलआय 2, व सारीचे 1 रुग्णांचे स्वॅब नमुने घेण्यात आलेले आहेत व एकूण 3 नमुन्यांपैकी सर्वच 3 नमुने निगेटिव्ह आढळलेले आहेत.

जिल्ह्यातील 11 कंटेनमेंट झोनमध्ये 75 आरोग्य पथकांमार्फत 3 हजार 341 घरांचे सर्वेक्षण झालेले आहे. तर, एकूण सर्वेक्षित लोकसंख्या 12 हजार 797 आहे.

योग्य उपचाराने कोरोनामुक्त

होता येते ;युवतीने मानले आभार


योग्य उपचाराने कोरोना मुक्त होता येते, नागरिकांनी घाबरून न जाता काळजी मात्र घ्यावी.कोरोना ग्रस्त रुग्णांना कोविड रुग्णालयामध्ये आवश्यक त्या सर्व सुविधा व उपचार दिल्या जातात. मला सुद्धा सर्व सुविधा व उपचार मिळाल्याने मी आज कोरोना मुक्त झाली आहे.आपण सर्वांनी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करून तसेच सुरक्षित अंतर ठेवून दैनदिन कार्य करावे, योग्य उपचाराने कोरोनाशी लढू शकतो,असे मत कोरोना मुक्त झालेल्या युवतीने व्यक्त केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies