चंद्रपूर जिल्ह्यात 15 रुग्ण ग्रामीण भागातील
चंद्रपूर 28 मे (MH34UPDATENEWS): जिल्ह्यात ग्रामीण भागात 8 व महापालिका क्षेत्रात 3 असे एकूण 11 कंटेनमेंट झोन कार्यान्वित होते. परंतु,बिनबा गेट चंद्रपूर येथील कंटेनमेंट झोनला 14 दिवस पूर्ण झाल्यामुळे एक कंटेनमेंट झोन कमी करण्यात आल्याने सध्या एकुण 10 कंटेनमेंट झोन कार्यान्वित आहे. सदरील झोनमधील रुग्णांचा व इतर सर्व रुग्णांचा नियमित पाठपुरावा सुरू आहे. दरम्यान 22 रुग्णांपैकी 15 रुग्ण ग्रामीण भागातील आहेत. जिल्ह्यात सध्या एकूण 10 कंटेनमेंट झोन सुरू असून अती जोखमीच्या संपर्कातील व्यक्तींची संख्या 80 व कमी जोखमीच्या संपर्कातील व्यक्तींची संख्या 51 असे एकूण 131 संपर्कातील व्यक्तींची संख्या असून 85 संपर्कातील व्यक्तीचे स्वॅब नमुने घेण्यात आलेले आहेत व त्यापैकी 6 पॉझिटिव्ह, 7 निगेटिव्ह व 9 प्रतीक्षेत आहेत.उर्वरित 12 व्यक्ती जिल्ह्याबाहेरील असल्याने स्वॅब नमुने घेण्यात आलेले नाही व इतर जिल्ह्यांना कळविण्यात आलेले आहे. जिल्ह्यांत 10 कंटेनमेंट झोनमध्ये 71 आरोग्य पथकामार्फत 3 हजार 151 घरांचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून 12 हजार 69 सर्वेक्षित लोकसंख्या आहे. दरम्यान ग्रामीण भागामधील चंद्रपूर 6, बल्लारपूर 2, पोंभूर्णा 1, सिंदेवाही 2, मुल 3, ब्रह्मपुरी 1 पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. तसेच शहरी भागामधील बल्लारपूर 1, वरोरा 2 ‌ पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.तर चंद्रपूर महानगरपालिका मधील कृष्णनगर 1, बिनबा गेट 1, बाबुपेठ 1, बालाजी वार्ड 1 असे पॉझिटिव्ह रुग्ण आहे. यापैकी कृष्णनगर‌ एक व बिनबा गेट एक असे एकूण दोन रुग्ण कोरोनामुक्त होऊन त्यांना सुटी देण्यात आली आहे.

Post a comment

0 Comments